AISSMS ITI – औद्योगिक प्रशिक्षण देणारी सर्वोत्तम संस्था

प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

कोणत्याही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि उत्तम पायाभूत सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर AISSMS  संस्थेचा विद्यार्थ्यांना योग्य सुविधा आणि शैक्षणिक मार्गदर्शन देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. “

AISSMS-Private Industrial Training Institute संस्थेचे वैशिष्ठय आहे कि इथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या कौशल्य आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाला देखील तितकेच महत्व दिले जाते. त्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि सुविधा पुरवल्या जातात –

उच्च दर्जाच्या आणि अद्यावत पायाभूत सुविधा :

आज संस्था सोलापूर महामार्गावर असलेल्या बोरीभडक ता.दौंड जि.पुणे येथे कार्यरत असून तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात पुढे आणून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याच्या विशिष्ट उद्देशाने संस्थेने आपले कार्य चालू ठेवले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळणे देखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविण्या बाबत संस्था नेहमीच कार्यरत आहे.

अ) अद्यावत यंत्रसामग्री आणि प्रशिक्षण :

आज औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडताना दिसून येत आहे तसेच नवनवीन संकल्पना विकसित होत आहेत. त्या अनुषंगाने संस्थेतील विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती, अद्यावत यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि योग्य त्या सुविधा पुरवल्या जातात. अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी जर कधी यंत्रसामग्री उपलब्ध नसेल तर अशा वेळी ज्यांच्यासोबत आपला सामंजस्य करार झालेला आहे त्या कंपनी किंवा शोरूम्स मध्ये जे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत ते देण्याचा प्रयत्न असतो त्याचबरोबर त्यांचे ट्रेनरदेखील येऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.

ब) वाहतूक सुविधा :

संस्था पुण्यापासून साधारण ३० किमी अंतरावर आहे. त्यामुळे जास्त अंतरावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्याजाण्याची सोय असावी यासाठी पुण्यात शिवाजीनगर पासून ते ट्रेनिंग सेंटर पर्यंत अशी बस सेवा देखील देण्यात आलेली आहे.

क) शैक्षणिक सुविधा :

या संस्थेत विद्यार्थ्यांना कार्यशाळा, ग्रंथालय, कॉम्पुटर लॅब, क्रीडांगण, उत्तम प्रतीचे वर्ग आणि बांधकाम अश्या अनेक सुविधा आहेत.याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी त्यांना अनुभवी शिक्षकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. तसेच शासनाने केलेल्या निरीक्षणात संस्थेने सतत उत्तम दर्जा आणि मानांकने (Grades) प्राप्त केलेली आहे.

ड) संस्थेचा परिसर –

विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यासोबत त्यांना योग्य ते वातावरण मिळणे देखील तितकेच आवश्यक आहे . पर्यावरणाचे महत्व बाळगून संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडी असून विद्यार्थ्यांना प्रसन्न नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेण्याचा अनुभव मिळतो.

इ) व्यापार विशिष्ट संरचना –

संस्थेत १२ ट्रेड्स प्रकारातील एकूण ५० युनिट्स आहेत. ज्याद्वारे विद्यार्थी त्यास हव्या त्या क्षेत्रात आपले करियर निवडू शकतो . ज्यामध्ये प्रत्येक ट्रेड प्रकारातील प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि आवश्यक त्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात.

ऐतिहासिक वारसा :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या AISSMS या संस्थेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यामध्ये संस्थेच्या मुख्य ठिकाणी जुन्या पद्धतीने बांधकाम असलेली ऐतिहासिक वास्तू संस्थेचे वैशिष्ठय खुलवते. १९३२ मध्ये AISSMS संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीला मिलिटरी स्कूल चालू करण्यात आले आणि त्यानंतर १९९१ मध्ये संस्थेने आपले तांत्रिक क्षेत्रातील काम सुरु केल्यानंतर AISSMS-Private Industrial Training Institute ची स्थापना करण्यात आली आणि आजही संस्था यशस्वीरीत्या
आपली वाटचाल करत आहे .

संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात अनेक यश प्राप्त करावे हि मुख्य अपेक्षा असते. एकंदरीत आपल्या मूळ उद्दिष्ठ्यांवर चालणाऱ्या ह्या संस्थेस अनेक महान व्यक्तींचा वारसा लाभलेला आहे. आणि त्याच तत्वांवर आजही संस्था आपले कार्य पुढे नेत आहे.

-प्राध्यापक, श्री. राजेंद्र वाळुंज

 प्राचार्य

AISSMS – Private Industrial Training Institute