मशिनिष्ट ग्राइंडर ट्रेडचे महत्त्व आणि उद्देश

आजच्या उद्योगप्रधान काळात आयटीआय म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे तांत्रिक शिक्षणाचे एक सशक्त माध्यम बनले आहे. विविध तांत्रिक कौशल्यांची तयारी येथे केली जाते. यामध्ये मशिनिष्ट ग्राइंडर ट्रेड हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मागणी असलेला ट्रेड आहे.

मशिनिष्ट ग्राइंडर ट्रेड म्हणजे काय?

या ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्रकारच्या ग्राइंडिंग मशीनवर अचूकतेने काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मायक्रोन लेव्हलपर्यंत अचूकता आणि मिरर फिनिशिंग मिळवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत ही कला शिकवली जाते.


या ट्रेडचे महत्त्व
    1. औद्योगिक गरजांची पूर्तता:
      मशीन, पार्ट्स, वाहने, रेल्वे, जहाज, यंत्रसामग्री यांना अचूक आकार आणि हाय-अक्युरसीसह फिनिशिंगची गरज असते. ही गरज केवळ प्रशिक्षित ग्राइंडरच पूर्ण करू शकतात.
    2. तंत्रज्ञानाची ओळख:
      प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मशीनची रचना, ऑपरेशन्स, मेजरींग इन्स्ट्रुमेंट्स आणि उपकरणांची सखोल माहिती दिली जाते.
    3. रोजगाराच्या मोठ्या संधी:
      उत्पादन उद्योगात – विशेषतः ऑटोमोबाईल, जहाज उत्पादन, रेल्वे उपकरणे, संरक्षण क्षेत्र, तसेच HAL, DRDO सारख्या शासकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
    4. गुणवत्तापूर्ण उत्पादन:
      अचूकता आणि दर्जा यामुळे उत्पादनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढते.
    5. कामात सुरक्षितता:
      सर्व काम सुरक्षित पद्धतीने कसे करावे याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग असतो.

या ट्रेडचा उद्देश
  • विविध ग्राइंडर मशीन्स हाताळण्याची योग्य पद्धती शिकवणे
  • धातूंचे प्रकार समजून घेऊन त्यानुसार ग्राइंडिंग करणे
  • काम करताना सुरक्षेचे नियम कटाक्षाने पाळणे
  • उद्योगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण देणे
  • विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे

निष्कर्ष:

मशिनिष्ट ग्राइंडर ट्रेड हा केवळ अभ्यासक्रम नसून उद्योगातील प्रत्येक उत्पादनाला दर्जेदार बनवण्याचा पाया आहे. अचूकता, सखोल ज्ञान आणि उत्तम फिनिशिंग ही या ट्रेडची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला मशीनिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर हा ट्रेड तुमच्यासाठी योग्य आहे. तो तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुमच्या भविष्याला उत्तम आकार देईल.

 

– प्रवीण गाजंरे
(मशिनिष्ट ग्राइंडर निर्देशक)