करियर प्रकाशमान करणारा आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड

आजच्या काळात वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मोबाईल चार्ज करायचा असो, पंखा चालवायचा असो, किंवा कारखान्यात मोठे यंत्र सुरु करायचे असो, सगळीकडे इलेक्ट्रिशियनची नितांत गरज भासते. इलेक्ट्रिशियन बनण्यासाठी किंवा कौशल्ये अवगत करण्यासाठी सर्वात सोपा व उत्तम मार्ग म्हणजे आयटीआयमधील ‘इलेक्ट्रिशियन’ ट्रेड. या ट्रेडच्या माध्यमातून उत्तम इलेक्ट्रिशियन म्हणून विद्यार्थी आपल्या करियरला सुरुवात करू शकतात.

आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड म्हणजे काय?

इलेक्ट्रिशियन ट्रेड हा एक व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम असून मुख्यतः १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षांचा असतो. या कोर्समध्ये खालील गोष्टी शिकवल्या जातात:

  • घरगुती व औद्योगिक वायरिंग
  • विद्युत उपकरणांचे दुरुस्ती व देखभाल
  • जनरेटर, मोटर, ट्रान्सफॉर्मर यांचे काम
  • सुरक्षा नियम व यंत्रणा
  • प्रॅक्टिकल व थिअरी दोन्हीवर भर

अभ्यासक्रमाचे फायदे:

१) नोकरीच्या भरपूर संधी

  • सरकारी क्षेत्र: महावितरण, रेल्वे, संरक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इ.
  • खासगी क्षेत्र: विविध कंपन्या, कारखाने व कन्स्ट्रक्शन उद्योग
  • अप्रेंटिसशिप करून अनुभव मिळवता येतो
  • कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नामांकित कंपन्यांत संधी

२) स्वतंत्र व्यवसायाची संधी

  • स्वतःचे इलेक्ट्रिक उपकरण दुरुस्तीचे दुकान
  • वायरिंग, फॅन/पंप दुरुस्ती व्यवसाय
  • कॉन्ट्रॅक्टर लायसन्स घेऊन सरकारी व खासगी कामे

३) परदेशात जाण्याची संधी

  • आखाती देश (दुबई, कतार, सौदी), युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये इलेक्ट्रिशियनला मोठी मागणी आहे.

४) कमी खर्चात मोठा फायदा

  • तुलनेत कमी खर्च
  • प्रशिक्षणादरम्यान शिकाऊ म्हणून पगारही मिळतो

५) कौशल्यावर आधारित करिअर

  • प्रत्यक्ष मशीनवर काम करून शिकवले जाते
  • कौशल्यपूर्ण इलेक्ट्रिशियन घडतो

६) पुढील शिक्षणाच्या संधी

  • आयटीआय नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
  • डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश
  • नंतर पदवीपर्यंत शिक्षण घेता येते

७) उपयुक्त प्रमाणपत्र

  • NTC/NAC प्रमाणपत्र मिळते
  • सरकारी नोकरी व खासगी नोकरीसाठी उपयुक्त
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत अतिरिक्त प्रमाणपत्र

निष्कर्ष:

आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड हा अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आत्मनिर्भरतेकडे नेणारा राजमार्ग आहे. शहर, गाव, वाडी-वस्त्या सर्वत्रच इलेक्ट्रिशियनची गरज भासते. जर तुम्हाला तांत्रिक कामात रस असेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असेल, तर हा अभ्यासक्रम तुमचे आयुष्य बदलू शकतो व भविष्य उज्ज्वल करू शकतो.

 

 

– बी. व्ही. शिंदे

(निदेशक, इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम)