राजेंद्र वाळुंज
प्राचार्य
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी ही १०० वर्षांपेक्षा जुनी शिक्षण संस्था असून १९९१ मध्ये तांत्रिक क्षेत्रात काम करणेस सुरुवात केली.
ग्रामीण भागातील मुलांना तंत्र शिक्षण मिळावे तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने ऑगस्ट १९९१ मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बोरीभडक, ता. दौंड. येथे सुरुवात केली.
तदनंतर इंजिनीरिंग, पॉलीटेकनिक, फार्मसी व इतर शाखा संस्थेने सुरु केल्या आहेत.
परिसरातील औद्योगिक क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविणे, बेरोजगारांना उच्च गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण देऊन त्यांच्या रोजगारांच्या संधी वाढविणे, प्रोडक्शन ओरिएंटेड स्कीमद्वारे मुलांना चांगले स्किल देणे.ITI चे ट्रेनिंग पूर्ण केलेल्या मुलांना त्यांचे उज्वल भविष्यासाठी चांगल्या कंपन्यात प्लेसमेंट करणे हि सर्व उद्दिष्टे आहेत व ती पूर्णत्वाकडे नेणेसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. सध्या १२ व्यवसायाच्या ५० तुकड्यामध्ये ६०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण उत्तमरित्या घेत आहेत.
AISSMS ITI मधील पायाभूत सुविधा –
१) यंत्रसामुग्रीयुक्त प्रशस्त कार्यशाळा व आधुनिक उपकरणे
२) अनुभवी गटनिदेशक / निदेशक वर्ग
३) ३५ एकराचा सुसज्ज परिसर
४) विद्यार्थ्यांसाठी जाणे येणे साठी बस सेवा
५) विविध शॉर्ट टर्म कोर्सची उपलब्धता
६) स्वतंत्र अंतिम परीक्षा केंद्र, शिकाऊ उमेदवारासाठी कॅम्पस इंटरव्हियू
७) विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहणेसाठी तज्ञाकडून समुपदेशन व्यवस्था
८) AVR/E-Learning Room ची व्यवस्था
९) ग्रंथालय , सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
१०) ITI प्रवेशासाठीचे ARC केंद्र
AISSMS ITI ऑन जॉब ट्रेनिंग
विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतांना त्यांना प्रत्यक्षात कंपन्या तील कामकाजाची माहिती व्हावी यासाठी ऑन जॉब ट्रेगिंगचे आयोजन करावे लागते. MMV/RACM या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी जात असतात. मारुती सुझुकी, फोर्ड इंडिया या कंपन्याच्या पुणे परिसरातील विविध ठिकाणच्या शोरुम मध्ये २ ते ३ आठवड्याचे ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाते. तसेच RACM चे प्रशिक्षणार्थी विविध रेफ्रिजरेशन शॉपमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठविले जातात. तसेच इतर कंपन्यामधिल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी उपस्थित असतात. त्यामुळे इतर ITI पेक्षा आपण प्रशिक्षणार्थ्याना ट्रेनिंग देणे-मध्ये एक पाउल पुढे आहोत.
स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अल्पमुदतीचे कोर्स Short Term Courses
ITI मध्ये प्रवेश घेणारा प्रशिक्षणार्थी फक्त एकाच कोर्सचे ट्रेनिंग न घेता तो सर्व कोर्स मध्ये प्राविण्य व्हावा यासाठी त्याला बहु कौशल्यता निर्माण व्हावी यासाठी संस्थे-अंतर्गत अल्पमुदतीचे कोर्सची व्यवस्था केली आहे. CNC/VMC या आधुनिक मशिन द्वारे प्रशिक्षणार्थ्यात कौशल्य निर्माण व्हावे यासाठी संस्थेने व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे
ॲटोकॅड , कॅलिब्रेशन अँन्ड मेन्टनन्स ऑफ मेजरींग इन्स्टुमेंट, इलेक्ट्रिकल कंट्रोल सर्किट फॉर मशीन टूल्स असे अल्प मुदतीचे कोर्सेस सुरु करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मल्टिस्कील व्हावा म्हणून संस्था सतत प्रयत्नशील असते.
AISSMS ITI केल्यानंतर पुढील करिअर संधी
१) स्वयंरोजगाराच्या विविध संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध
२) ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदविका अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. त्यासाठी
शासनाकडून ITI साठी २% राखीव जागांची उपलब्धता आहे.
3) NTC प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परदेशात रोजगार करणेची संधी प्राप्त होते.
कंपनीच्या दृष्टीकोनातून मुलांना मार्गदर्शन गोष्टी
१) कंपनी मधील नियम, अटी व शिस्ती बाबतीची माहीती
२) वेळेचे महत्व (बंधन) पाळता यावे.
३) प्रॅक्टिकल ओरिएन्टेड शिक्षण असावे.
४) सुरक्षिततेचे ज्ञान असावे.
५) मशिनवर काम करतांना आपली व मशिनची सुरक्षितता तसेच आपल्या सहकार्याची सुरक्षितता जपणे.
६) ही कंपनी माझी आहे अशी भावना प्रत्येकाने बाळगली पाहीजे तरच आपले व कंपनीचे भवितव्य चांगले होईल असा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावा.
AISSMS ITI विद्यार्थी विकास प्रक्रिया
जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचे निवडीनुसार व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतो. तेव्हा त्याच्या कोर्स प्रमाणे शासनाने ठरवुन दिलेल्या NSQF अभ्यासक्रमानुसार ट्रेनिंग पूर्ण करावयाचे असते. सदर अभ्यासक्रमात ITI ची ओळख निवडलेल्या कोर्सची ओळख त्यातील अभ्यासक्रम मशिन व सुरक्षितता आवश्यक घटक. अलाईड ट्रेड अभ्यासक्रम त्या ट्रेडला अनुसरुन इंजिनिअरींग ड्रॉईंग व कर्मशालेय गणित व शास्त्र या अभ्यासक्रम विषयाचा समावेश केलेला असतो. त्याचप्रमाणे एखाद्या प्रशिक्षणार्थी व्यवसाय सुरु करणार असेल त्याबाबतची माहिती, नोकरी करणारा असेल संवाद कौशल्य वाढवून मार्केटिंग कसे करणार या बाबत इंग्रजीचे ज्ञान वाढविते. किंवा एखादा लघु उद्योजक होणार असेल तर ह्याकरीता आवश्यक असणारे गुण कामगार कायदेविषयक माहिती या सर्वांची माहिती “रोजगार क्षमता कौशल्ये” या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहे.
AISSMS ITI मध्ये उपलब्ध असणारे कोर्सेस
१ वर्ष – डिझेल मेकॅनिक, वेल्डर
२ वर्ष – फिटर, टर्नर, मशिनिष्ट, ग्राईन्डर, टूल अँन्ड डायमेकर (जिग्ज अँन्ड फिक्चर) इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँन्ड एअर कंडिशनर मेकॅनिक, मोटार
मेकॅनिक व्हेईकल, पेंटर
AISSMS ITI मधील स्कोप व संधी
जे विद्यार्थी ITI च्या विविध व्यवसायात प्रवेश घेतात व प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर AITT च्या अंतिम परिक्षेला बसून जे उत्तीर्ण होतात. अशा प्रशिक्षणार्थ्यासाठी विविध आस्थापनात शिकाउ उमेदवारी मिळण्याची संधी प्राप्त होत असते. या करीता परिसरातील विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. यातुन ज्यांची निवड करतात. त्यांना किमान १ वर्ष कंपनीमधील अँप्रेन्टीशिप पूर्ण करावी लागते व ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुशल कारागीर चे प्रमाणपत्र प्राप्त होते. यामुळे त्या सर्वांची कुशल कामगार म्हणून ओळख निर्माण होते. औद्योगीक क्षेत्रातला अनुभव घेतल्यानंतर ते प्रशिक्षणार्थी स्वत:चा व्यवसायही सुरु करु शकतात. MMV/DLM या ट्रेडचे प्रशिक्षणार्थी स्वत:चे गॅरेज सर्व्हिसिंग स्टेशन सुरु करुन विविध गाड्यांचे दुरुस्तीचे काम करु शकतात. WD या ट्रेडचे प्रशिक्षणार्थी स्वत: फॅब्रिकेशनचे कामे करुन स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करु शकतो.
इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँन्ड एअर कंडिशन मेकॅनिकचे प्रशिक्षणार्थी सुद्धा स्वत:चा व्यवसाय सुरु करुन इतरांना सुद्धा रोजगाराची संधी प्राप्त करुन देवु शकतात.
AISSMS ITI ची वैशिष्ठे
१) ISO 9001 : 2015 प्रमाणपत्र मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण केंद्र.
२) आधुनिक उपकरणे, यंत्रसामुग्री प्रशस्त कार्यशाळा/सुसज्ज कॉम्प्युटर लॅब.
3) प्रशिक्षण देणेसाठी प्रशिक्षीत शिक्षक वर्ग.
४) शासकीय दर्जानिहाय निरिक्षणात “अ” दर्जा प्राप्त सलग ७ वर्ष
५) २००७ मध्ये दर्जा निहाय निरिक्षणात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त.
६) परिसरातील विविध कंपन्यांमध्ये On Job Training, औद्योगिक सहली, प्रोजेक्ट प्रदर्शन या माध्यमातुन ITI ची ओळख
७) फोर्ड इंडिया,एस कुदळे कार सोबत सामंजस्य करार
८) कॅम्पस इंटव्ह्युच्या माध्यमातुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यासाठी रोजगाराची संधी प्राप्त करुन देणे.
९) विविध अल्पमुदतीचे कोर्सेस